Home EDUCATIONAL Essay & Speech Essay on coronavirus in Marathi | मराठीत कोरोना वायरस वर निबंध

Essay on coronavirus in Marathi | मराठीत कोरोना वायरस वर निबंध

0
Essay on coronavirus in Marathi | मराठीत कोरोना वायरस वर निबंध

Essay on Coronavirus in Marathi: साल 2020 मध्ये संपूर्ण जगाचे सर्व व्यवहार थांबले आणि या वर्षाने लोकांना आप-आपल्या घरात कैद होण्यास भाग पाडले याचे कारण कोरोना नावाचा एक संसर्गजन्य आजार. या संसर्गजन्य आजाराने जगातील सर्व देश भयभीत झाले आणि लोकांना त्यांची जीवनशैली बदलण्यास या रोगाने भाग पाडले. जगात असे देश फारच कमी होते जेथे या आजाराचे रूग्ण सापडले नाहीत.

भारतात असलेल्या दाट लोकसंख्येमुळे हा कोरोनाव्हायरस (कोविड-19) संसर्गजन्य रोग वेगाने पसरण्याची भीती होती आणि हा आजार भारता मध्ये एक चिंतेचे वातावरण घेवून आला. या कारणास्तव, 23 मार्च 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातील भारत सरकारने सूरवातीला 21 दिवस देशव्यापी लॉकडाऊन करण्याचे आदेश दिले.

परंतु हा लॉकडाउन वर्ष 2021 मध्येही बऱ्याच प्रमाणात अद्यापही सुरू आहे.

Essay on Coronavirus in Marathi

कोरोनाव्हायरस (कोविड-19) हा जगासाठी एक नवीन आजार होता, ज्यामुळे त्यावर कोणतेही औषध नव्हते आणि कोणालाही त्याची लक्षणे नीट माहित नव्हती. म्हणूनच, संपूर्ण जगाबरोबरच, भारत देशानेही या संसर्गजन्य आजाराला आळा घालण्यासाठी लॉकडाउनचे आदेश दिले.

हा संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी, देशातील सर्व वाहतूक सेवा बंद करण्यात आल्या. सर्व शासकीय आणि खाजगी कार्यालये, शाळा आणि इतर सार्वजनिक उपक्रम अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले. उद्देश हा होता की हा संसर्गजन्य रोग लोकांमध्ये इतका पसरू नये की त्यावर नियंत्रण मीळवणे कठीण जाईल.

सरकारने प्रत्येक व्यक्तीस सार्वजनीक ठिकाणी मास्क घालने बंधनकारक केले. आवश्यक कामा शिवाय कोणीही घराबाहेर पडू नका अशा सूचना देण्यात आल्या. सर्व सरकारी आणि खाजगी रुग्णालये, वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर आणि स्वच्छता कर्मचार्‍यांना या संक्रामक रोगाचा सामना करण्यासाठी तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.

केंद्र सरकारला देशावर येऊ घातलेल्या या कोरोनाव्हायरस (कोविड -19) संसर्गजन्य रोगाचे संकट समजले होते.  इतर देशांमध्ये या संसर्गजन्य कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या पतिस्थितीचा अंदाज सरकारला आला होता. 

भारतात कोरोना वायरस

Essay on Coronavirus in Marathi  

केंद्र सरकारचे कोरोना आजारा बाबतचे मूल्यांकन योग्य असल्याचे सिद्ध झाले आणि हा कोरोना व्हायरस संसर्गजन्य आजार देशात पसरण्यास सुरुवात झाली. देशात या आजाराची एक कोटीहून अधिक भारतीयांना लागण झाली.  परंतु आपल्या देशातील वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर आणि स्वछता कर्मचार्‍यांनी स्वताच्या जीवाची पर्वा न करता या कोरोना रूग्ण व्यक्तिना बरे केले.  

या कोरोना विषाणूमुळे (कोविड-19) आजपर्यंत जगातील 25 लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत भारतात या आजारामुळे 1.5 लाखापेक्षा जास्त लोक मरण पावले आहेत. याद्वारे आपण समजू शकता की जर या रोगावर वेळेवर उपचार केले गेले नाही तर हा रोग प्राणघातक सिद्ध होऊ शकतो.

वेळेवर उपचार केल्यास हा कोरोना विषाणूचा (कोविड-19) आजार अगदी सहजतेने बरे होतो. या आजारासाठी सरकारने सर्व ठीकाणी कोरोना चिकीस्ता सुविधा केंद्र सुरू केले आहेत.

एखाद्या कोरोना संभाव्य व्यक्तीची तपासणी येथे वेळेत झाली तर तो सहजपणे या संसर्गजन्य आजारावर मात करू शकतो. सरकार या संदर्भात सातत्याने देशातील जनतेला माहिती देउन जागरूक करत असते.

कोरोना वायरस (COVID-19) 2021 मध्ये

Essay on Coronavirus in Marathi  

आज, वर्ष 2021 मध्ये, हा आजार काही अंशी नियंत्रणात असल्याचे दिसून येत आहे, याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या रूग्णालयाचे डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, तातडीच्या सेवेतील कर्मचारी आणि पोलिस. या संसर्गजन्य आजारापासून देशातील लोकांना वाचविण्यासाठी यांनी रात्रंदिवस प्रयत्न केला आणि या प्रयत्नात ते यशस्वी सुद्धा झालेले आहेत.

देशातील लोकांना कोरोना (कोविड-19) विषाणूंपासून वाचविण्याच्या प्रयत्नात, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे बरेच डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, तातडीचे सेवा कर्मचारी आणि पोलिसही मरण पावले आहेत. तरीही या कोरोना योद्ध्यांनी आपले काम करायचे सोडले नाही.

Essay on Coronavirus in Marathi

कोरोना योद्ध्यांचे आपल्या देशाबद्दल आणि देशवासियांच्या प्रती समर्पण भावनेचे कौतुक करण्यासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी आणि सर्व देशवासीयांनी या कोरोना योद्धांना अभिवादन केले आणि त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

जरी हा कोरोना विषाणू (कोविड-19) वर्ष 2021 मध्ये कमी होताना दिसत आहे, परंतु आपल्याला हे लक्षात ठेवले पाहिजे की हा एक अती संसर्गजन्य रोग आहे आणि तो पुन्हा केव्हाही पसरू शकतो.

डॉक्टरांचे म्हणणे आहे की पुढील 4-5 वर्षे हा रोग मानवांसोबत राहणार आहे, म्हणूनच आपण जागरूक राहण्याची गरज आहे. हा रोग टाळण्यासाठी आपल्याला सरकारने घालून दिलेल्या प्रत्येक नियमाचे काटेकोरपणे पालन करायला हवे.

कोरोनवायरस वायरस काय आहे?

Essay on Coronavirus in Marathi  

कोरोना व्हायरस(कोविड-19) हा संसर्गजन्य रोग आहे जो नव्याने सापडलेल्या कोरोनाव्हायरसमुळे होतो.

कोरोना (कोविड-19) विषाणूमुळे संक्रमित बहुतेक लोकाना श्वास घेण्यास त्रास होतो पण बरेच कोरोना रूग्ण डॉक्टरांच्या औषधांद्वारे सहजपणे बरे होतात, त्यांना विशेष उपचारांची आवश्यकता नसते.

वृद्ध लोक आणि हृदयरोग, मधुमेह, तीव्र श्वसन रोग आणि कर्करोग यासारख्या आजारांनी ग्रस्त लोकांना जर या कोरोनाव्हायरस आजाराची लागण झाली तर हा रोग त्यांच्यामध्ये गंभीर रूप धारण करू शकतो. या कोरोना आजाराने मृत्यु पावलेल्या लोकांमधे जास्त करून वृद्ध आणी व्याधिग्रस्त लोकांचाच समावेश आहे.

कोरोना (कोविड-19) विषाणू प्रामुख्याने एखादा संक्रमित व्यक्ती जेव्हा शिंकतो, खोकतो किंवा बोलतो तेव्हा जे थेंब आजुबाजुला पसरतात किंवा समोरच्या व्यक्ती वर उडतात हा आजार प्रामुख्याने त्यातून पसरतो. म्हणून हे महत्वाचे आहे की प्रत्येकाने खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल ठेवला पाहिजे. 

कोरोना (कोविड-19) विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येकाने सार्वजनीक ठिकाणी मास्क घातला पाहिजे. आपले हाथ साबणाने वारंवार धुतले पाहिजेत. आपल्या चेहरयाला, नाकाला, डोळ्याला किंवा मास्कला वारंवार स्पर्श करु नये.

जागतिक आरोग्य संघटना (WHO)

Essay on Coronavirus in Marathi  

जागतिक आरोग्य संघटना (World Health Organisation) ही आरोग्य यंत्रणेच्या क्षेत्रात काम करणारी एक आंतरराष्ट्रीय कीर्तीची संघटना आहे. WHO ने या कोरोना (कोविड-19) विषाणूबद्दल काही तथ्य प्रसारित केले आहे ज्याची माहिती प्रत्येकासाठी खूप महत्वाची आहे:-

➡ व्यायाम करताना लोकांनी मास्क घालू नये कारण मास्क आरामात श्वास घेण्याची क्षमता कमी करू शकतो. घाम आल्याने मास्क ओलावू शकतो ज्यामुळे श्वास घेणे कठीण होते. घाम आल्याने मास्कवर सूक्ष्मजीवांच्या वाढीस प्रोत्साहन मिळते.

➡ पाण्यामधे पोहताने पाण्याद्वारे कोरोना विषाणु पसरू शकत नाही.

➡ कोरोनाव्हायरस रोग (कोविड-19) विषाणूमुळे होतो, बॅक्टेरियामुळे नव्हे. कोविड-19 आजाराला कारणीभूत असलेल्या व्हायरसला कोरोनाविरिडे (Coronaviridae) म्हणतात.

➡ कोरोना वायरस (Coronavirus) आजाराने संक्रमीत होणारे बहुतेक लोक या आजारातून पूर्णपणे बरे होतात. जर आपल्याला खोकला, ताप आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल तर लवकरात लवकर वैद्यकीय उपचार घ्या.

➡ मद्यपान केल्याने कोविड-19 पासून तुमचे रक्षण होणार नाही. उलटपक्षी मद्यपान करणे आरोग्यासाठी घातक असते.

➡ काळी मिरीचा वापर सूप किंवा रोजच्या आहारात केला म्हणून कोरोना आजारास कुठल्याच प्रकारचा प्रतिबंध होत नाही. हा कोरोना आजारावरचा उपाय नाही.

➡ कोरोना व्हायरस (Coronavirus) हा आजार घरातील माश्यांपासून (Fly) पसरत नाही.

➡ डास चावल्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग (कोविड-19) होत नाही.

➡ लसूण खाल्ल्याने कोरोना विषाणूचा धोका थोडासाही कमी होत नाही. 

➡ सर्व वयोगटातील लोकांना कोरोना विषाणूची लागण होऊ शकते. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वाना या आजाराचा त्रास होऊ शकतो.

➡ गरम पाण्याने आंघोळ केल्याने करोना आजाराचा धोका कमी होत नाही.

➡ थंड आणि उष्ण दोन्ही प्रकारच्या हवामानात करोना विषाणू जीवंत राहू शकतो. 

➡ कोरोना विषाणूंपासून स्वत: चे रक्षण करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे इतरांपासून कमीतकमी 1 मीटरचे शारीरिक अंतर राखणे आणि आपले हात वारंवार स्वच्छ करणे होय. असे केल्याने आपण आपल्या हातातील विषाणूचा नाश करू शकता आणि संसर्गही टाळू शकता.

जर आपण हात न धुता वारंवार आपले डोळे, तोंड आणि नाक किंवा मास्कला स्पर्श केला तर कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता असते.

भारताची स्वदेशी कोरोना वायरस (COVID-19) वैक्सीन

Essay on Coronavirus in Marathi 

सर्व देशातील डॉक्टर्स व वैज्ञानिक वर्ष 2020 पासून कोरोना विषाणू (कोविड-19) रोगावर लस (vaccine) बनवण्याचा प्रयत्न करीत होते. भारतातील डॉक्टर्स व वैज्ञानिक सुद्धा याच प्रयत्नात होते.

आपल्या देशातील प्रतिभावान शास्त्रज्ञ व डॉक्टरांनी वर्ष 2021 मध्ये देशी (भारतीय) लस तयार करण्यात यश मिळविले आहे, ज्यामुळे कोरोना विषाणू रोगाला प्रतिबन्ध होऊ शकेल.

आपल्या देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यानी घोषणा केली आहे ही लस देशातील प्रत्येक दिली जाईल. 

कोरोना लस (vaccine) तयार केली गेली आहे, याचा अर्थ असा नाही की कोरोना व्हायरस हा रोग आता जगातून कायमचा नाहीसा होईल. डॉक्टर म्हणतात की हा रोग पुढील 4-5 वर्षे मानवजाती सोबतच राहील.

आम्हाला सर्व नियमांचे काटेकोर पालन करून या कोरोना विषाणू (कोविड-19) संसर्गजन्य रोगाविरुद्ध लढा द्यावा लागेल. या रोगाला पराभूत करून आपणास आपल्या देशाला एक निरोगी आणि शक्तिशाली राष्ट्र बनवायचे आहे.


😯 Read here about corona virus (Covid19)

 ➡ जागतिक आरोग्य संघटना (World Health Organisation)


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here